वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात व प्राणीसंग्रहालय पुष्प प्रदर्शनाची तयारी जोरदार सुरु आहे. यंदा प्रदर्शनाचे 25 (रौप्य महोत्सव) वे वर्षे आहे.

31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2020 या कालावधीत पुष्प प्रदर्शन आयोजित केले आहे.

या प्रदर्शनात शोभिवंत फुलांचा आणि झाडांच्या कुंडयांची आकर्षक मांडणी समावेश आहे, पाने-फुले वापरुन तयार केलेल्या विविध पुष्प रचना लक्ष वेधून घेत आहेत.

पुष्प प्रदर्शनामध्ये मुख्य आकर्षण असते ते म्हणजे विविध प्रकारच्या पुष्परचना, रसिकांना पाहण्यास मिळणार आहेत.

प्रदर्शनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदर्शनाच्या निमित्ताने वृक्ष प्राधिकरण व मुंबई महानगरपालिका यांनी तयार केलेल्या “मुंबईची चिन्हे” प्रतिकृती देखील प्रदर्शन कालावधीत पहावयास मिळतील. उदाहरण गेट वे ऑफ इंडिया, म्हातारीचा बूट, भारतातील पहिली ट्राम वगैरे वगैरे.

यामध्ये प्रामुख्याने **** नर्सरी, **** नर्सरी यांचे विशेष योगदान आहे. तसेच या कामी उद्यान रचनाकार ***** यांनी मार्गदर्शन केलेले आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते 31 जानेवारीस सकाळी 12 वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.

Published by Aamchi Mumbai

A news agency is an organization

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started